मायभूमी

सांगोल्याची अनन्या शेंडे अंतिम फेरीत

अलीज क्लब दिल्लीद्वारे आयोजित २७ वी मिस व मिस्टर टिन इंडिया स्पर्धा

मायभूमी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : अलीज क्लब दिल्लीद्वारे आयोजित २७ वी मिस व मिस्टर टिन इंडिया स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अनन्या शेंडे हिने अंतिम फेरी गाठली आहे. भारतातील सर्वात जुन्या किशोरवयीन स्पर्धेची २७ वी अलीज क्लब मिस आणि मिस्टर टीन इंडिया: २०२५ किशोरवयीन मुलांची ब्युटी विथ ब्रेन स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे.

देशभरातील प्रतिभावान किशोरांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये सांगोल्यातील १३ वर्षीय अनन्या अमर शेंडे हिने उज्ज्वल आणि प्रतिभावान कामगिरी केली. तिने सौंदर्य क्षेत्रातील नामवंत अलीज क्लब दिल्लीद्वारे आयोजित या २७ व्या मिस व मिस्टर टिन इंडिया स्पर्धेमध्ये गौरवास्पद कामगिरी करून अंतिम फेरीमध्ये अभिमानाने आपले स्थान मिळविले आहे.

ही स्पर्धा किशोरवयीन मुलांसाठी देशातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. न्यू इंग्लिश स्कूल सांगोल्याचे प्रतिनिधित्व करीत  अनन्या हिने तिच्या दृढनिश्चय, आत्मविश्वास आणि मोहक व्यक्तिमत्त्वाद्वारे ही ओळख मिळविली आहे. या कामगिरीने तिला या राष्ट्रीय व्यासपीठावर एक वेगळे स्थान प्राप्त स्थान करून दिले आहे.

सांगोल्याची कन्या अनन्या हिला मिस इंडिया व्हीवर्स चॉईससाठी ALEE ANANYA.S हा मेसेज 57575 या नंबरला सेंड करून मतदान करा.

सांगोल्यातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अमर शेंडे आणि अंजली शेंडे यांची अनन्या शेंडे ही कन्या आहे. १९९७ मध्ये भारताची पहिली किशोरवयीन सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारी अलीज क्लब दिल्ली ही अग्रगण्य संस्था आहे. भारतातील किशोर मुला-मुलींसाठी सर्वोत्कृष्ठ व्यासपीठ म्हणून या स्पर्धेला लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड्समधील प्रतिष्ठित यादीद्वारे मान्यता प्राप्त आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून मॉडेलिंग, अभिनय आणि फॅशन करिअरचे दरवाजे सर्व किशोरवयीन मुला-मुलींसाठी उघडत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अनन्या शेंडे हिची निवड झाल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. अंतिम फेरीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *