१५,१७ आणि १९ वर्षांखालील मुलींची निवड चाचणी स्पर्धा
मायभूमी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्यावतीने शनिवार, दि. ३० ऑगस्ट रोजी १५,१७ आणि १९ वर्षांखालील मुलींची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदरची निवड चाचणी स्पर्धा पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे शनिवारी सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते ५.३० यावेळेत होणार आहे. असे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांनी कळविले आहे.
निवड चाचणी प्रक्रिया निवड चाचणी चेअरमन किरण मणिहार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर, मानसी जाधव, राजेंद्र गोटे यांची समिती करणार आहे.
निवड चाचणी अगोदर सर्व खेळाडूंनी आपले खेळाडू रजिस्टर करून घेणे महत्त्वाचे (बंधनकारक) आहे. निवड चाचणीला जो कोणी उतरणार आहेत, त्यांनी ५०० रुपये निवड चाचणी फी क्यू आर कोडद्वारे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अकाउंटमध्ये जमा करावे. अकाउंटमध्ये पाचशे रुपये टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन येते. त्या ऑप्शनमध्ये खेळाडूचे नाव व जन्मतारीख टाकून त्याची प्रिंट काढून सिलेक्शनच्या दिवशी ती दाखवावी. रजिस्टर झालेल्या खेळाडूंनी सोबत रजिस्टर कार्ड आणणे बंधनकारक आहे. पाचशे रुपये भरल्याची पावती दाखवून सिलेक्शनला उतरावे.
१५ वर्षे वयोगटासाठी 1-9-11 च्या पुढील व 31-8-2014 च्या आतील मुलींना उतरता येईल. १७ वर्षे वयोगटासाठी 1-9-2008 च्या पुढील मुलींना उतरता येईल. १९ वर्षे वयोगटासाठी 1-9-2007 च्या पुढील मुलींना उतरता येणार आहे.














Leave a Reply