मायभूमी

उद्योग उभारणीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो‌द्योग मंडळाकडून आवाहन

मायभूमी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : उद्योग उभारणीसाठी बेरोजगार उमेदवारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो‌द्योग मंडळाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे. बेरोजगार उमेदवारांनी उद्योग उभारणीसाठी या योजनेचा लाभ घ्यावा.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८  वर्षे पूर्ण असावे. दहा लाखांवरील उत्पादन उद्योग व पाच लाखांवरील सेवा उद्योगासाठी शिक्षण आठवी पास, वार्षिक उत्पन्नाची अट नाही. वैयक्तिक, भागिदारी, वितीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट/संस्था सोसायटी स्वयंसहाय्यता बचत गट नवीन उद्योगासाठी योजना लागू आहे. कुटुंबातील एक व्यक्तीस (पती किंवा पत्नी) लाभ घेता येईल. अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या व महामंडळाच्या योजनतून लाभ घेतलेला नसावा. अर्ज करण्याची वेबसाईट  https://maha-cmegp.gov.in असे आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व इतर योजनांबाबत या कार्यालयात ऑनलईन प्रस्ताव निशुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यांत आली आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क  अथवा रक्कम आकारण्यात येत नाही.   या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर कार्यालयातीलच अधिकृत अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. या कामासाठी बाहेरील खाजगी एजंट, दलाल, सल्लागार यांच्याशी संपर्क करण्यात येऊ नये. या योजनेच्या कामासाठी कोणत्याही खाजगी अथवा त्रयस्थ व्यक्तींची नेमणूक केलेली नाही.

याबाबत अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कार्यालय, एस. बी. आयकॉन कॉम्पलेक्स (तळमजला), किल्लेदार मंगल कार्यालयाचा बाजूस, अग्रेसन भवनसमोर, आसरा चौक, होटगी रोड, सोलापूर, didic.solapur@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा. असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *