Kalyani Pengonda appointed as President of Padmashaali Sakhi Sangham
सचिवपदी रुचिरा मासम, उपाध्यक्ष लक्ष्मी यनगंदूल, कार्याध्यक्षपदी सविता येदूर
मायभूमी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षपदी कल्याणी पेनगोंडा, सचिवपदी रुचिरा मासम, उपाध्यक्षपदी लक्ष्मी यनगंदूल, कार्याध्यक्षपदी सविता येदूर यांची निवड करण्यात आली आहे. २०२५-२६ या सालासाठी ही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी दिली आहे.

कल्याणी पेनगोंडा
पद्मशाली समाजातील महिला भगिनी या कष्टाळू आहेत. सामाजिक कार्यासोबत समाजातील गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करु, अशी ग्वाही पद्मशाली सखी संघमच्या नूतन पदाधिकार्यांनी निवडीनंतर दिली.
सविता येदूर
Padmashali Sakhi Sangham चे नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
- सहसचिव : वनिता सुर्रम, अंजली वलसा, श्रावणी कनकट्टी.
- ‘खजिनदार : गीता भूदत्त.
- सहखजिनदार : हेमा मैलारी.
- ‘समन्वयिका : सुनिता निलम, पल्लवी संगा, ममता तलकोक्कूल.
- कार्यकारिणी सदस्य : सुलोचना माचर्रला, मंजुळा दुधगंडी, संगीता सिद्राल, सुप्रिया मासम, लता जन्नू, रजनी दुस्सा, प्रियंका अडटला, लावण्या मच्छा, गीता त्यारला, पौर्णिमा कंदीकटला, अमृता रच्चा.
रुचिरा मासम
ही निवड श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन आणि पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली आहे. यावेळी सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली आदी उपस्थित होते.
लक्ष्मी यनगंदूल
जर पद्मशाली समाजातील महिलांना अद्यापही पद्मशाली सखी संघमचे सदस्य होण्याची आवड असेल, त्यांनी नूतन अध्यक्ष कल्याणी पेनगोंडा यांच्याशी ( +917385283012) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन Shri Markendeya Social Foundation चे संस्थापक कोंडा यांनी केले आहे.










Leave a Reply