मायभूमी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपीक पदाची भरती मोहीम

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे अर्ज करण्याचे आवाहन

मायभूमी न्यूज नेटवर्क||

सोलापूर  :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे  लिपीक टंकलेखक हे अशासकीय पद मेस्कोमार्फत  भरावयाचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांची रोजगार पटावर नोंद आहे, फक्त त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल.

तरी दि. 3 सप्टेंबर 2025  पूर्वी  या कार्यालयात आपले अर्ज  सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह (मूळ कागदपत्र व त्यांची छायांकित प्रती 2 ) सादर करावेत. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखती घेण्यात येतील.

सदर पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग  दर मिनिट किमान  30 शब्द असल्याचे वा‍णिज्य प्रमाणपत्र,  महाराष्ट्र शासनाचे MS-CIT प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा  मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहिल. तरी सदर संधीचा सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सोलापूर यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *