मायभूमी

समर्थ करियर अकॅडमीतर्फे  11 आदर्श क्रीडा पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय क्रीडा दिन; दि. २९ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळा

मायभूमी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : ड्रीम फाऊंडेशन व श्री समर्थ करियर अकॅडमीतर्फे  11 आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. दि.  29 ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील विविध शाळा व कॉलेजमधील क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

हा पुरस्कार सोहळा  जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,  द. का.असावा प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जितेंद्र पवार, अण्णाप्पा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणगी श्री समर्थ करियर अकॅडमीचे संचालक रवी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्री समर्थ करियर अकॅडमी सभागृह, येथे होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,शाल, फेटा बुके असे आहे. हा पुरस्कार सुहास छंचुरे व काशिनाथ भतगुणगी यांनी जाहीर केले आहे.

पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे:

  • विरेश अंगडी, क्रीडा शिक्षक (स.हि.ने प्रशाला).
  • प्रा. विक्रांत विभुते, शारीरिक शिक्षण संचालक (संगमेश्वर कॉलेज महाविद्यालय, सोलापूर).
  • संजय पंडित, क्रीडा शिक्षक (श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला).
  • प्रा.नावेद मुन्शी, (एम.ए. पानगल उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज, सोलापूर).
  • प्रशांत सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक (लिटील फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल).
  • शिवानंद सुतार, क्रीडा शिक्षक (गांधी नाथा रंगजी मराठी मिडीयम विद्यालय, सोलापूर).
  • रोहन घाडगे, क्रीडा शिक्षक (पी.एस. इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, सोलापूर).
  • नेताजी पवार, क्रीडा शिक्षक (भारतीय विद्यापीठ हायस्कूल, सोलापूर).
  • अब्दुल्ला चौधरी, क्रीडा शिक्षक (सनराईस इंग्लिश मॅडम हायस्कूल, सोलापूर).
  • रविंद्र चव्हाण, क्रीडा शिक्षक, (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, सोलापूर).
  • प्रमोद कुनगुलवार, क्रीडा शिक्षक (द.का.आसावा प्रशाला).
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *