संध्याराणी बंडगर, अरूण राठोड खेळाडू, दीपक चिकणे प्रशिक्षक, चंद्रकांत रेम्बर्सू संघटक पुररस्काराने सन्मानित
मायभूमी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : आंतराराष्ट्रीय लॉन टेनिसपटू संध्याराणी बंडगर व धावपटू अरूण राठोड खेळाडू तर धनुर्विद्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक चिकणे व क्रिकेटचे संघटक चंद्रकांत रेम्बर्सू यांना समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत समृद्धी स्पोर्टस क्लबच्यावतीने जिल्हास्तरीय समृद्धी क्रीडा सेवा पुररस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, भाजपा प्रदेश सरचिटणीस वसंत वडगावे, क्लबचे संचालक चंद्रकांत होळकर, पालिका क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप, क्लबचे संस्थापक संजय सावंत, अध्यक्ष प्रा. राजू प्याटी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजापूर रस्त्यावरील मयुरवनच्या हॉलमध्ये शाल, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. पुरस्काराच्या स्वरुपात खेळाडूंना 2100 रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, मानचिन्ह देण्यात आले. राठोड स्पर्धेसाठी गेल्यामुळे त्याच्यावतीने त्याच्या मातोश्रीने हा पुरस्कार स्वीकारला.

याप्रसंगी क्लबचे पदाधिकारी राजन सांवत, मल्हारी बनसोडे, सुरेश भोसले, क्रीडा संघटक संतोष गवळी, दशरथ गुरव, संतोष खेंडे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य क्रीडा पत्रकार अजितकुमार संगवे, सत्येन जाधव व गणेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब माने, श्रीमंत कोळी यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. आभार प्रदर्शन क्लबचे उपाध्यक्ष राजन सावंत यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव, संजय बनसोडे, राजकुमार कोळी, शाहनवाज मुल्ला, पुंडलीक कलखांबकर, गणेश कुडले, रविंद्र चव्हाण, शिवाजी वसपटे, श्रीमंत कोळी, प्रमोद कुरकुळ्ळी यांनी परिश्रम घेतले.

क्रीडाशिक्षकांमुळेच आमदार
क्रीडाशिक्षकांनी कष्ट घेतल्यामुळेच खेळाडू घडतात. मी क्रीडाशिक्षकांतूनच आमदार झालो. त्यामुळे समृद्धी क्लबने खेळाडू, प्रशिक्षक व संघटकांना पुरस्कार सुरू करुन क्रीडा क्षेत्रातील चांगला उपक्रम राबविला आहे.
खेळाडूंसाठी क्रीडा वसतिगृहाची गरज
खेळाडूंना निवासस्थानासाठी मोठी व्यवस्था नसल्यामुळे राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. क्रीडाप्रेमींनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमांतून याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन संस्थापक सचिव संजय सावंत यांनी केले. याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पालिका क्रीडाधिकारी, श्रीकांत घोलप आणि पुरस्कारार्थीच्यावतीने चंद्रकांत रेम्बर्सू, संध्याराणी बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले.















Leave a Reply