जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांचे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मायभूमी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत 13 उपकंपन्याची स्थापना शासनाने केली आहेत.
उपकंपन्याची स्थापना खालीलप्रमाणे –
- लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ
- सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज)
- स्व. विष्णूपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज)
- संत नामदेव महाराज शिपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज)
- संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज)
- सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ
- संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज)
- संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज)
- संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज)
- आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ
- जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत समाज)
- संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज)
- संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज)
महामंडळाचे जिल्हास्तरावर सोलापूर येथे कामकाज सुरु करण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, महामंडळामार्फत सहा योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वंयसिद्धी व्याज परतावा योजना या पूर्णतः ऑनलाईन स्वरुपाच्या आहेत. या योजनांसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. 20 टक्के बीजभांडवल योजना व थेट कर्ज योजना या ऑफलाईन स्वरूपाच्या असून, त्याचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, उपलप मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर-413003 दूरध्वनी क्रमांक (0217-2312595) या ठिकाणी संपर्क साधावा. असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांनी केले आहे.







Leave a Reply