मायभूमी

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय पदांची भरती

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन 

मायभूमी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील  सैनिकी  मुलींचे वसतीगृह,  सोलापूर येथे अशासकीय सहायक वसतीगृह अधीक्षकाचे एक पद भरावयाचे आहे.  प्रतिमाह 24 हजार 875 रुपये इतके मानधन असेल.

उमेदवार युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी असावी.  उमेदवारास मराठी, इंग्रजी  टंकलेखन व संगणक हाताळण्याचे  ज्ञान असणे आवश्यक आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील  युध्द  विधवा व माजी सैनिक  विधवा पत्नींनी आपले अर्ज सैनिक सेवेची इतर शैक्षणिक कागदपत्रे दि.  3 सप्टेंबर 2025  पूर्वी या कार्यालयात जमा करावीत. त्यानुसार दि. 3  सप्टेंबर 2025 रोजी मुलाखती   घेण्यात येतील. उमेदवारांनी मुलाखतीस येताना  स्वत:ची मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.  तरी सोलापूर जिल्ह्यातील  पात्र व इच्छूक  युध्द  विधवा व माजी सैनिक  विधवा पत्नींनी  या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *